तरुणांनी संरक्षण क्षेत्रात काम का करावे याची आठ कारणे

पुणे - December 5, 2020

देशाचे संरक्षण क्षेत्र त्याच्या अनन्यसाधारण अशा महात्त्वामुळे तरुणांना नेहमीच खुणावत असते. तरुण या क्षेत्राकडे का आकर्षिले जातात, पाहुयात या लेखात...

देशाच्या संरक्षणासाठी त्या त्या देशाच्या संरक्षण फौजा अतिशय कर्तव्यदक्षतेने आणि स्वतःचे प्राण पणाला लावून काम करत असतात. अशा क्षेत्राचे, शूरतेला नेहमीच महत्त्व देणाऱ्या समाजाला कौतुक असल्यास नवल नाही आणि ते असावे सुद्धा.

आपल्या देशाचे संरक्षण करण्याची आणि प्राणाची बाजी लावून काम करण्याची इच्छा म्हणूनच तरुणांमध्ये अगदी बालपणापासून चेतविली जाते. तुम्हीसुद्धा या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक असाल तर हा लेख तुम्हाला तुमचा निर्णय घेण्यात नक्कीच साहाय्य करू शकतो.

तरुण निरनिराळ्या कारणांमुळे संरक्षण क्षेत्राकडे आकर्षिले जातात. त्यात त्या क्षेत्राला असलेले महत्त्व आणि रुबाब हे घटक समाविष्ट असतातच शिवाय या क्षेत्रात काम करत असलेल्या जवानांना आणि अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, उंची पगार हे घटक शुद्ध सामावलेले असतात.

अशाच काही कारणांची आज आपण या लेखात उजळणी करणार आहोत. चला तर मग पाहुयात

देशसेवा करण्याची मिळत असलेली अभिमानास्पद संधी :

संरक्षण क्षेत्रात काम करणे म्हणजे देशसेवा करणे होय. अशी संधी फार थोड्या नाशिबवानांना मिळत असते. या क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी लागत असलेली प्रचंड मेहनत आणि कठोर श्रम हेच या क्षेत्रात प्रवेश घेत असलेल्या तरुणांच्या कार्यक्षमतेचे आणि बुद्धिमत्तेचे लक्षण मानले जाते.

स्वाभाविकपणे, तरुण याक्षेत्राकडे आकर्षिले जातात. तुम्ही घेतलेली मेहनत तुमच्या संरक्षण क्षेत्रातील जीवनातच नव्हे तर तुमच्या समोरच्या आयुष्यातही नेहमीच लाभदायक ठरते.

रोजगार हमी :

प्रचंड वेगाने वाढत चाललेय स्पर्धेमुळे तरुण नेहमीच अशा क्षेत्राकडे डोळा लावून असतात ज्यात त्यांना रोजगाराची हमी मिळू शकेल आणि भविष्यात कुठल्याही छोट्या-मोठ्या संकटांमुळे त्यांचा रोजगार बंद होणार नाही. संरक्षण क्षेत्र तशी हमी तरुणांना देण्यात आजवर यशस्वी ठरले आहे. मला माझा रोजगार वाचवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील हे भयच संरक्षण क्षेत्र काढून घेते.

संरक्षण क्क्षेत्रात नोकरी मालावून निवृत्तीपर्यंत आणि त्यानानंतरही काही काळ तुम्हाला तुमच्या रोजगाराची कुठलीही काळजी घ्यावी लागत नाही.

स्वास्थ्य सुरक्षा :

संरक्षण क्षेत्रात प्रवेश म्हणजे तुमच्या स्वास्थ्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे होय. अशक्त तरुण या क्षेत्राला कुठल्याही कामाचे नाही. या क्षेत्रात नोकरीला असताना सशक्तपणाला असलेले महत्त्व लक्षात घेऊन, तुमच्या स्वास्थ्याची योग्य ती निगा राखली जाते यात शंकाच नाही. अगदी निवृत्तीपर्यंत तुमच्या शरीराची योग्य ती निगा राखली जाते किंबहुना ठेवावीच लागते.

त्यामुळे तरुणपणात आधीपासूनच असलेल्या सशक्ततेच्या आकर्षणाला यामुळे दुजोरा मिळतो आणि संरक्षण क्षेत्राकडे तरुण आकर्षिले जातात.

मोठा पगार आणि राहण्याच्या सोयी :

कुठल्याही नवीन प्रवेश केलेल्या तरुणाला २०,००० ते ६०,००० पागार दरमहा मिळत असतो. परंतु, त्याहीपेक्षा जास्त आकर्षण असते ते या सोबत येणाऱ्या सोयी सुविधांचे.

त्यात प्रमुख सोय असते ती राहण्याची. सर्व संरक्षण क्षेत्रातील नोकरी धारकांना स्वच्छ आणि आरामदायक अशा संरक्षण कॉलोनीत राहण्याची संधी मिळते ज्यात मैदानी खेळांसाठी मोठे मैदान आणि आणि इतर सोयी सुविधांचा सुद्धा समावेश असतो.

वैद्यकीय सुविधा :

ज्या क्षेत्रात चांगल्या स्वास्थ्याला महत्त्व आहे तेथे वैद्यकीय सुविधा मिळण्यात काहीच नवल नाही. संरक्षण क्षेत्रात तुमच्यासोबतच तुमच्या कुटुंबातील सदस्यांना देखील या सुविधा मिळत असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या स्वास्थ्यविषयक खर्चाची कुठलीही चिंता राहत नाही.

प्रतिष्ठा :

देशसेवा करण्याची संधी मिळत असलेल्या नोकरीची प्रतिष्ठा काही औरच. कुठल्याही कामात मिळणार नाही असे समाधान आणि तेवढीच प्रतिष्ठा संरक्षण क्षेत्रात काम करून मिळत असते. त्यामुळे तुमचे समाजातील वरचे स्थान तर अटळ होतेच परंतु तुमची मन सुद्धा अभिमानाने नेहमीच वर राहते. अशा जीवनाचे तरुणांना आकर्षण असणे हे स्वाभाविक आहे.

उच्च शिक्षणाच्या संधी :

एक तरुण म्हणून तुम्ही नेहमीच पुढील ध्येयाच्या शोधत असता. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात काम करत असताना उच्च शिक्षणाचा अभ्यास सुद्धा बरेच तरुण करत असतात. संरक्षण फौजांत अशा बऱ्याच तरुणांची निरनिराळे पाठ्यक्रम घेऊन तयारी केली जाते. अगदी निवृत्तीनंतरसुद्धा तुम्हाला याचा योग्य तो फायदा मिळतो आणि तुमच्या कष्टांचे चीज होते.

जाताना…

संरक्षण क्षेत्रात मिळणारे हे असे फायदे तुम्हाला हे क्षेत्र रोजगार मिळवून निवडण्यास नक्कीच प्रवृत्त करतील. एक तरुण म्हणून तुम्ही या क्षेत्राकडे आकर्षिले असाल तर तुम्हाला गरज आहे त फक्त एका चांगल्या मार्गदर्शकाची. देशात अशा भरायचा संस्था कार्यरत आहेत ज्या विद्यार्थ्यांकडून संरक्षण सेवांच्या प्रवेश परीक्षांची तसेच मुलाखतीची योग्य ती तयारी करवून घेतात आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन देतात. अशाच संस्थांमधून योग्य ती शोधणे आणि तुमच्या जीवनाला पंख लावून उंच भरारी घेणे हेच तुमचे लक्ष्य असायला हवे.

इंडियामॅप डिजिटलद्वारे डिजिटल ब्रँड परिवर्तन