पुणे, महाराष्ट्र स्थित हिंदवी अकादमी हे महाराष्ट्रातील अग्रगण्य सैन्य आणि पोलीस कारकीर्द प्रशिक्षण केंद्र होय. हिंदवी अकादमी नागरी (Civil) आणि संरक्षण दलांच्या प्रवेश परीक्षांसाठी योग्य ते मार्गदर्शन देण्यासोबतच उमेदवाराला महाराष्ट्र पोलीस, भारतीय संरक्षण दल म्हणजेच भारतीय सीमा बल (BSF), कर्मचारी निवड आयोग (SSC), राखीव पोलीस बल (RPF), केंद्रीय राखीव पोलीस बल (CRPF), रेल्वे पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), तसेच विविध कारकुनी आणि व्यापारी अशा विविध नागरी सेवांत रोजगार मिळविण्यास मदत करते.

संरक्षण आणि नागरी सेवेत काम मिळवू पाहणाऱ्या इच्छुकांसाठी

हिंदवी अकादमी वरील सर्व इच्छुकांसाठी उत्कृष्ट समुपदेशन, मार्गदर्शन तर पुरवितेच परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला विविध नागरी प्रवेश परीक्षांसाठी लागणारे सर्वांगीण मार्गदर्शनही करते.

सर्व इच्छुकांमधील सर्वोत्तम गुणांना बाहेर येण्यास वाट मोकळी करून देऊन त्यांना अभिजन अशा महाराष्ट्र संरक्षण आणि नागरी सेवांसाठी तयार करणे, हेच आमचे ध्येय होय. अकादमीत मार्गदर्शन पावलेल्या आणि आज अशा विविध सेवेत कार्यरत राहून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या स्वप्नांची पुर्ती करत असलेल्या शंभराहून अधिक विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे.

अकादमी विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेवर खास भर दिलेले आरामदायक, सर्वसुविधायुक्त निवसकेंद्र पुरविते. परीक्षांसाठी लागणाऱ्या सर्व सोयी असलेले वाचनालय, पोषक अन्न, व्यायामशाळा, खेळाचे मैदान तसेच धावपट्ट्या ही अकादमी पुरवीत असलेल्या काही सेवांची लक्षणीय उदाहरणे होत.

अकादमी पारंपरिक मार्गदर्शनासोबतच अनुभवी व्यक्तींचे व्यख्यान सुद्धा आयोजित करते ज्यामुळे विद्यार्थ्यांना मुबलक संधी मिळतील आणि योग्य असे व्यावहारिक प्रशिक्षण मिळू शकेल. आमच्या सर्व विद्यार्थ्यांना अशी व्याख्याने ऐकण्यासाठी अकादमी नेहमीच प्रोत्साहित करत असते.

विशेष सेवेत प्रवेश करणे आव्हानात्मक आणि खडतर काम आहे, याची पूर्ण कल्पना आम्हाला असून, विद्यार्थ्यांना सर्वांगीण मार्गदर्शन देऊन योग्य तो आत्मविश्वास प्रदान करणे आणि त्यांना त्यांच्या भयावर मात करून त्यांचे ध्येय मिळविण्यास तसेच देशाच्या, समाजाच्या, आणि त्यांच्या कुटुंबाच्या हितासाठी कार्य करण्यास तयार करणे यासाठी हिंदवी अकादमी झटते आहे.

इंडियामॅप डिजिटलद्वारे डिजिटल ब्रँड परिवर्तन